करुणा मुंडे यांनी NDTV मराठीशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवारांकडे देण्यात आला असून उद्या २ मार्च रोजी ते जाहीर करतील. उद्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शंभर टक्के धनंजय मुंडे राजीनामा देतील, असं करुणा मुंडे यावेळी म्हणाल्या. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यास महायुतीत मोठी उलथापालथ होऊ शकते.