Akola Drought| दहिगाव गावंडेत दुष्काळी परिस्थिती, चार फूट वाढणारी कपाशी दीड फुटावरच खुंटली

अकोला पश्चिम विदर्भातील 'कापसाचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यात अलनिनोचे संकट आणि दोन महिन्यांच्या खंडवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्याच्या खारपाटातील दहिगाव गावंडे शिवारात पावसाअभावी सोयाबीन आणि उडीद पीक पूर्णपणे हातातून गेले आहे. तर दुसरीकडे, चार फूट वाढणारी कपाशी केवळ दीड फुटावरच खुंटली असून, झाडांना १०-१५ ऐवजी केवळ २ ते ३ बोंडेच लागल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. यामुळे येथील बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन हेक्टरी ७० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, तसेच जनावरांसाठी चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी आर्त हाक त्रस्त शेतकऱ्यांनी दिली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी...

संबंधित व्हिडीओ