देशभरात गाजलेलं नीट पेपरफुटी प्रकरण ताजं असतानाच महाराष्ट्रात MPSC पेपरफुटीचा आरोप करण्यात येतोय. MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या दोन दिवसांआधीच सोशल मीडियावर आल्याचा आरोप करण्यात आलाय. विरोधकांनी या मुद्द्यावरून घणाघाती आरोप करायला सुरूवात केलीय. तर MPSC आणि अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारी दाखल झाल्यात. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या प्रकरणात एका खाजगी क्लास चालकावरही आरोप करण्यात येतोय..हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात..