निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यामध्ये तब्बल पाचशे सेहेचाळीस कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरामध्ये आचारसंहिता भंगाच्या सात हजार तीनशे साठ तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे.