कल्याणमधील मुख्य बाजारपेठेत गेल्या 22 तासांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही महावितरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. याआधीही या भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे व्यापारी आणि ग्राहकांना मोठा फटका बसत असून, त्यांनी महावितरणच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे.