कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली गावातून एक अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १० वर्षांच्या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. इतर मुलांसोबत गणेश मंडपात खेळून घरी आल्यानंतर तो आईच्या मांडीवर झोपला आणि तिथेच त्याने प्राण सोडले. इतक्या कमी वयाच्या मुलाला हृदयविकाराचा झटका का आला? लहान मुलांमध्ये वाढणारे हे प्रमाण आणि ते रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावर हा विशेष रिपोर्ट.