आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत, मात्र मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर आलेल्या धमकीच्या मेसेजमुळे सर्व पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. जिथे लाखांच्या संख्येने भाविक बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी करतात, त्या लालबागमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी घेतला आहे.