गेल्या फेब्रुवारी महिन्यात मोदींच्या अमेरिका दौऱ्यामध्ये भारत-अमेरिका यांच्यात व्यापार करार होण्याची तयारी सुरू झाली होती. पण आठ महिन्यांनंतरही हा करार झालेला नाही. दरम्यानच्या काळात ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांना मोठा धक्का बसला आहे. भारताने चीन आणि रशियासोबतचे संबंध अधिक मजबूत केल्याने अमेरिकेला जोरदार धक्का बसला आहे. त्यामुळेच ट्रम्प यांना आता भारताला चिथावणी देण्याची वेळ का आली आहे आणि दोन्ही देशांमध्ये संबंध का बिघडले आहेत, याचा आढावा या खास रिपोर्टमध्ये.