राज्यात उद्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. मुंबईतही विसर्जनाची जय्यत तयारी सुरू असून, मुंबई पोलिसांनी या सोहळ्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. विसर्जनाच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक असलेल्या गिरगाव चौपाटीवर आतापासूनच पोलिसांच्या तुकड्या दाखल झाल्या आहेत. या तयारीचा आढावा घेण्यासाठी, एनडीटीव्ही मराठीच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी घटनास्थळावरून हा खास रिपोर्ट पाठवला आहे.