मुंबई पोलिसांना अनंत चतुर्दशीच्या एक दिवस आधीच धमकीचा मेसेज मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईत 14 पाकिस्तानी दहशतवादी घुसले असून 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. उद्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखो भाविक रस्त्यांवर उतरणार असल्याने सुरक्षेची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. या संकटावर पोलिस यंत्रणा कशी मात करणार आणि संभाव्य घातपात टाळण्यासाठी काय खबरदारी घेतली जात आहे, यावर हा विशेष रिपोर्ट.