मंत्री संजय शिरसाठ यांच्या तक्रारीनंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. शहरात चरस-गांजा विकणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी अटक करून ज्या भागात ते अंमली पदार्थांची विक्री करत होते, त्याच ठिकाणी त्यांची धिंड काढली. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या 'धिंड पॅटर्न'मुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.