बुलेटीनच्या सुरूवातीलाच बातमी NDTV मराठीनं भर पावसात केलेल्या मदतीची..लोणावळ्यातल्या मळवलीमध्ये पर्यटनासाठी गेलेलं एक कुटुंब अडकून पडलं होतं. या कुटुंबाने मळवली परिसरातला एक बंगला बुक केला होता. पण पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाल्याने हे कुटुंब त्या बंगल्यातच अडकून पडलं, पावसामुळे रविवारी त्यांनी घरी न परतण्याचा निर्णय घेतला, पण सोमवारी परिस्थिती आणखीनच बिकट झाली. संपूर्ण एक रात्र त्यांनी अन्नपाण्याविना काढली. लहान मुलं आणि महिलांची अवस्था फारच बिकट झाली होती, ही बातमी एनडीटीव्ही मराठीने दाखवताच, NDRF चं पथक तिथे पोहोचलं आणि या कुटुंबाची सुटका केली. त्यामुळे एनडीटीव्ही मराठीचे या कुटुंबाने आभार मानलेत..