नाशिकमधील सागर जाधव गोळीबार प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक करण्यात आली आहे. या गोळीबाराच्या कटात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. पूर्ववैमनस्यातून मंगळवारी पेठ रोड परिसरात सागर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.