Chh.Sambhajinagar Rain Alert | सिल्लोड तालुक्यात नुकसानीची भयंकर परिस्थिती, पिकांमध्ये गुडघाभर पाणी

छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय... या पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी तुमच्या चित्र आहे... या सिल्लोड तालुक्यातील शेखपूर, पिंपळगाव घाट, खेळणा नाडी भागातील हे दृश्य नुकसानीची भयंकर परिस्थिती दाखवणारी आहे... मका सारखी पिकं अक्षरशः आडवी झाली असून पिकांमध्ये गुडघाभर पाणी तुंबले आहे... दिवाळी दसऱ्यासारखा सण तोंडावर असताना झेंडूच्या फुलांची झाडे देखील पाण्याखाली गेल्याचं दिसून येत आहे... मराठवाड्यात पावसामुळे होत असलेल्या नुकसानाचे हे विदारक चित्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यासाठी पूरक आहे असं म्हणता येईल.

संबंधित व्हिडीओ