हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने ओढ्याला पूर आला आहे, शेतात कामासाठी गेलेले 70 ते 80 महिला आणि पुरुष शेतकरी ओढ्याला पूर आल्याने शेतात अडकले होते.. दरम्यान पांगरा शिंदे येथील गावकऱ्यांनी दोरीच्या साह्याने या शेतकऱ्यांना ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढला आहे.