जळगावमधील पाचोरा, एरंडोलमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. हिवरा नदीला पूर आल्यानं घरात पाणी शिरलं आहे. दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा येथील नुकसानग्रस्त भागाची व पूर परिस्थितीची पाहणी केली असून संपूर्ण तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आमदार किशोर पाटील यांनी दोन्हीही मंत्र्यांकडे केली आहे.