इंद्रायणीच्या पुरात अडकलेल्या चार भाविकांची सुटका, नदी पात्रातील संतोषगिरी आश्रमात अडकले होते भाविक

मावळमध्ये इंद्रायणी नदीच्या पुरात अडकलेल्या चार भाविकांची सुखरूप सुटका करण्यात आलीय.. कार्ला येथील इंद्रायणी नदी पात्रात असलेल्या संत संतोष गिरी आश्रमात चार भाविक गेल्या दोन दिवसांपासून अडकून पडले होते.. पीएमआरडीएच्या रेस्क्यू टीमकडून चार भाविक आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका श्वानाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं.इंद्रायणी नदीच्या पात्रात अनधिकृत बांधकामं झाल्यामुळे नदीचे पात्र वळवण्यात आले आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी पात्र सोडून रहिवासी भागात बसत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे

संबंधित व्हिडीओ