Gadchiroli Accident| कार उलटली, पोर्ला गावात भीषण अपघात; अपघातात 2 चिमुकल्यांसह 7 जण गंभीर जखमी

गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला गावानजीक एक भीषण अपघात झालाय.लग्न समारंभ आटोपून ब्रम्हपुरीवरून गडचिरोलीकडे परत येत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने चारचाकी वाहन पलटी झालंय. या अपघातात दोन चिमुकल्यांसह सात जण गंभीर जखमी झालेत. या अपघातामुळे काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ