अमेरिका जगातील महासत्ता आहे, नंबर एकची अर्थव्यवस्था आहे, लष्करी ताकद आहे, हे सगळं सगळ्या जगाला मान्य... मात्र म्हणून अमेरिकेची प्रत्येक देशाच्या प्रत्येक गोष्टीत लुडबूड प्रत्येक देश मान्य करेल असं थोडीच आहे. त्यातही सध्या अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपणच सगळ्या जगाचे बॉस असल्यासारखे बोलत सुटलेत. टॅरिफच्या जोरावर ते अनेक देशांना धमकावत आहेत. मात्र प्रत्येक देशाला त्याचं त्याचं हित जपायचं आहे आणि हे आता भारताप्रमाणे इतर देशही ठणकावून सांगू लागलेत. यात विशेष लक्ष वेधून घेतलंय ते ब्राझिल या दक्षिण अमेरिकन देशाच्या अध्यक्षांनी... लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी ट्रम्पना आपण जुमानणार नाही असंच थेट सांगितलंय. तर भारतानं ही फार आक्रमक न बोलताही अमेरिका आणि युरोपीय देशांचा दुटप्पीपणा उघड केलाय. पाहूया रशिया-युक्रेन युद्ध आणि टॅरिफच्या निमित्तानं जग कसं दुभंगलंय. आणि ट्रम्प यांना कशी जोरदार टक्कर मिळतेय ते