आठवड्याच्या पहिल्या दिवशी पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ठाण्यातील तीन हात नाका ते मुलुंड टोल नाका या दिशेने जाणाऱ्या वाहनांना अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि अर्धवट कामांमुळे ही समस्या अधिकच वाढली आहे, ज्यामुळे नोकरदार वर्गाची कोंडी झाली आहे.