मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे, अटल सेतू आणि समृद्धी महामार्गावर प्रवासी ईलेक्ट्रीक वाहनांना टोल माफ करण्यात आलाय.यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला करण्यात आलाय.. ई व्हेईकल उत्पादन आणि वापराला मोठ्या प्रमाणावर चालना मिळण्यासाठी राज्य सरकारने ‘ईव्ही’ धोरणांतर्गत हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत.. इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीवर राज्य सरकार प्रोत्साहन रक्कम देणार आहे,. ही रक्कम राज्य सरकारकडून वाहन उत्पादक कंपन्यांना दिली जाईल आणि वाहन खरेदीवर कंपन्या तेवढी रक्कम कमी आकारतील.