सोमवार (3 मार्च) पासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. हे अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष या अधिवेशनाकडे लागून आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरण, पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील बलात्काराची घटना या घटनांवरुन विरोधी पक्षाकडून सरकारला लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे.