Heavy Rain in Pune| Missing Link वर वाट लागली; Expressway का नदीचा प्रवाह? वाहनांचा मोठा खोळंबा

पहिल्याच पावसात मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरच्या मिसिंग लिंकची वाट लागलीय.या मिसिंग लिंकच्या सुरुवातीची सिमेंटची कमान कोसळली. कमान कोसळल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा पसरला आणि वाहतूक बंद झाली... गॅस कटरच्या साहाय्याने कोसळलेल्या कमानीचे अवशेष हटवण्यात आले, तसंच मातीचा ढिगारा हटवण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात आलं. अजूनही या मार्गावरची वाहतूक सुरळीत झालेली नाही.... मिसिंग लिंक सुरू व्हायला अजून ३ तास लागणार. आता ही दृष्य कोणती आहेत ती ओळखा... कनेक्टिंग लिंक मुळे मुंबई पुणे दरम्यानचा प्रवास अधिक जलद झाला आहे..पण आज दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने आज सकाळच्या वेळेत याच मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून एखादी नदी वाहते आहे की काय? अशी स्थिती होती.. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर टोल नाका गेल्यानंतर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बाजूला ही अशी नदी वाहात असल्याचं दिसत होतं.. किमान तीन ते चार तास अशाच प्रकारची स्थिती या भागात दिसत होती. शिवाय पाण्याचा वेग सुद्धा अधिक असल्याने वाहतूक खोळंबली होती..

संबंधित व्हिडीओ