हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालय, अवघ्या एक महिन्यानंतर काढणीला येणार पीक अतिवृष्टीने नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय..खरंतर शेतकऱ्यांची दिवाळी ही सोयाबीन पिकावर अवलंबून असते मात्र निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेले पीक हिरावून घेतल्याने दिवाळी कशी साजरी करणार असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.. दरम्यान या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी..