उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.मात्र त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाकडून यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना म्हणजे पहलगामनंतरचा आणखी एक भयंकर ‘दहशतवादी’ हल्ला आहे. हा राष्ट्रद्रोहच आहे. तर खरे देशभक्त मॅच बघणार नाहीत. असं विधान राऊतांनी केलंय.