घरात घुसून महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली. चेहऱ्याला मास्क लावलेल्या दोन चोरांनी पाठलाग करत काकू काकू म्हणत पत्ता विचारण्याचा बहाणा केला..तसंच प्यायला पाणी मागत मंगळसूत्र खेचले. महिलेने चोराचा टी शर्ट पकडत जोरदार प्रतिकार केला, आरडाओरड केली मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. पंचवटीच्या रामवाडी परिसरातील नंदिनी नायक या महिलेसोबत हा प्रकार घडला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.