पुण्यातील हडपसर मतदारसंघात प्रभाग क्रमांक १६ मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मोठी जनसुनावणी घेण्यात येत आहे. या सुनावणीला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार स्वतः उपस्थित राहून सगळ्या नागरिकांची समस्या स्वतः जाणून घेत आहेत. भरपूर मोठी यंत्रणा ही पक्षाच्या जनसुनावणीसाठी इकडे लावण्यात आली आहे. अगदी पुणे मनपा आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे पोलीस सह आयुक्त असे सगळेच अधिकारी याला उपस्थित आहे. तर नेमकी ही जनसुनावणी कशी चालू आहे? नागरिक इथे कशे पोहोचू शकतात आणि त्यांच्या समस्यांचं निवारण कस होणार या सगळ्याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी