बुलढाणा जिल्ह्यातल्या देवखेड येथील शेतकरी शेतात जाण्यासाठी चक्क थर्मकोलवर बसून शेतात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करतात .. खडकपूर्णा नदीचे 600 फुटाचे पात्र पार करताना जीव मुठीत घेऊन आजपर्यंत प्रवास सुरू आहे .. मात्र प्रशासन शेतकऱ्यांचा या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही .. याच गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या नदीवर पुलाचे काम करण्यात आले , मात्र ठेकदाराने ते अर्धवट सोडल्याने आता शेती कशी करायची असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे .. शेतातील सोयाबीन , उडीद मूग काढून घरी आणायचा आहे, मात्र रस्ता नसल्याने शेतात अनेक दिवसापासून जाऊ शकत नाही .. त्यामुळे पुलाचे काम करून रस्ता सुरळीत करावा , अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय आहे ..