Chh.Sambhajinagar मध्ये FDA ची मोठी कारवाई; छप्पन भोग थाळी Restaurant चा परवाना निलंबित

छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएच्या कारवाईत आणखी एक मोठा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपास रस्त्यावरील प्रसिद्ध 'मेसर्स छप्पन भोग थाळी रेस्टॉरंटचा परवाना रद्द करण्यात आलाय.. याठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने अचानक धाड टाकली.. या धाडीत रेस्टॉरंटच्या किचन आणि स्टोअर रूममध्ये किडे पडलेले पीठ, घाणीचे साम्राज्य आणि नियमबाह्य कारभार पाहून अधिकारीही हादरले. धक्कादायक म्हणजे, तपासणीदरम्यान रेस्टॉरंटच्या स्टोअर रूममध्ये ठेवलेल्या ज्वारी आणि बाजरीच्या पिठात प्रत्यक्ष जिवंत कीटक, अळ्या आणि त्यांचे अवशेष आढळले. याशिवाय, जुना अन्नसाठा तसाच ठेवून नियमांची पायमल्ली केली जात होती. रेफ्रिजरेटरमधील अन्नपदार्थांवर कोणतेही लेबल नव्हते, तर रसायन, प्लास्टिक आणि खाद्यपदार्थ एकत्र साठवून क्रॉस-कंटेमिनेशनचा थेट धोका निर्माण केला गेला होता..

संबंधित व्हिडीओ