नाशिकच्या खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा मोठी दुर्घटना समोर. रस्ता खचल्याने नवश्या गणपती परिसरात डंपर दहा ते बारा फूट खड्ड्यात कोसळला. रस्ते कामासाठी खडी उतरवत असताना घडली घटना. खडीचा डंपर थेट १० ते १२ फूट खोल खड्ड्यात कोसळला. रस्त्याच्या कामाचा दर्जा आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.मात्र या घटनेमुळे शहरातील रस्त्यांची काम खड्डे यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. पालकमंत्र्यांकडून ८० टक्के खड्डे बुजवल्याचा आणि कामाच्या गुणवत्तेबाबत दावा करण्यात येत असतानाच दुसरीकडे ही मोठी दुर्घटना समोर.