मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुनावणी न झाल्याच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीतील नेते, खासदार आणि आंदोलनात सहभागी विविध घटकांना आपल्या निवासस्थानी चहापानासाठी निमंत्रित केले आहे. दुपारी 4 वाजता होणाऱ्या या चहापान कार्यक्रमाला इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षांचे नेते, काँग्रेसचे खासदार, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरी समाजातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व घटकांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे.