संयुक्त राष्ट्राकडून संयमाचं आवाहन करण्यात आलेलं आहे तर भारताकडून एक एक करत पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक सुरु आहे. भारतानं चिनाब नदीचं पाणी कालपासून अडवलंय. बगलिहार धरणाचं पाणी अडवल्यानं नदी पूर्णपणे सुकली आहे. नदीपात्रात पाणीच उरलेलं नाही.