जानेवारीत 61 लाख SIP खाती बंद झाली आहेत. शेअर बाजारातील पडझडीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे SIP चा बुडबुडा फुटलाय का? म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आता फायद्याची राहिलेली नाही का ? असे अनेक सवाल त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात उभे ठाकलेत.या सगळ्यासंदर्भात गुंतवणूक सल्लागार महेश चव्हाण यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी श्रीरंग खरे यांनी.