जळगाव जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले आहे. केळी उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने चक्क केळीच्या पानावर निवेदन लिहून महसूल मंत्री बावनकुळे यांना देण्यात आले. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासोबतच दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. याबाबत आढावा घेत निवेदन देणाऱ्या केळी उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..