अमेरिकेच्या Visa धोरणाचा IT क्षेत्राला फटका, H-1B व्हिसा अर्जांमध्ये तब्बल 92 टक्क्यांची घट

अमेरिकेच्या H-1B व्हिसा धोरणामुळे भारतीय माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे....H-1B व्हिसाचे शुल्क एक लाख डॉलर करण्याच्या प्रस्तावाला ट्रम्प प्रशासनाने आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिल्यानंतर भारतीय IT कंपन्यांनी आपले धोरण बदलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर H-1B व्हिसासाठी होणाऱ्या नोंदणींमध्ये तब्बल ९२ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. अमेरिकेत कर्मचाऱ्यांना पाठवण्याचा खर्च वाढल्याने भारतीय कंपन्या आता अधिकाधिक प्रकल्प आणि मनुष्यबळ भारतातच ठेवण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत. त्यामुळे भारतीय IT क्षेत्रात नव्या रोजगार संधी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या बदलामुळे जागतिक IT उद्योगातील समीकरणेही बदलू शकतात.

संबंधित व्हिडीओ