Thackeray बंधूंच्या मोर्चावर Ashish Shelar, Ram Kadam आणि Gunaratna Sadavarte यांची जोरदार टीका

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कारभाराविरोधात आज मुंबईत 'गर्जना मोर्चाचे' आयोजन करण्यात आलं... या मोर्चात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र आले होते... त्यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धोरणांवर सडकून टीका केलीय.. याशिवाय EVM मशीन आणि SIR पूर्णपणे रद्द करावं अशी मागणी केली. या मोर्चाला प्रचंड जनसागर उसळल्याचं पाहायला मिळालं. राज्यात सध्या सुरू असलेल्या SIR राज ठाकरे यांनी विरोध केला.. तर देशात राष्ट्रपतींची निवडणूक होते, पण निवडणूक आयुक्तांची निवडणूक होत नाही.. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय... ठाकरे बंधूंच्या मोर्चावर आशिष शेलार,राम कदम,आणि गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केलीय.

संबंधित व्हिडीओ