राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. धुळे तालुक्यातील कासविहीर येथे ते पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पावसाअभावी पिकांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि दुष्काळाची वास्तविक स्थिती याचा ते आढावा घेणार आहेत. दरम्यान, जेथे मंत्री पाहणी करणार आहेत त्याच शेतातून आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.