पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलनातील गर्जनेचा आवाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचू द्या, असे आवाहन करत त्यांनी पुण्यातील आंदोलनाची तुलना महाराष्ट्राच्या जंतरमंतरशी केली. सरकार MPSC आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. तसेच MPSC चे शुद्धीकरण करण्याची गरज असल्याचे सांगत, जे शुद्ध पद्धतीने निवडणुका घेऊ शकत नाहीत, ते परीक्षा कशा घेणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.