सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक दिवसांच्या उकाड्यानंतर झालेल्या या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी बळीराजाची चिंता वाढली आहे. कापणीला आलेल्या आणि पिकलेल्या भात पिकांवर हा पाऊस कोसळल्याने मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता हातातोंडाशी आलेले पीक वाचवण्याचे नवे संकट उभे ठाकले आहे.