BJP च्या वतीनं देशभरात 'सेवा संकल्प अभियान', मुंबईत 'नमो सेवा-अनसुनी कहानियाँ' पथनाट्य उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपच्या वतीनं देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासातील सेवाभाव, समर्पण, राष्ट्रभक्ती आणि सुशासनाची प्रेरणादायी गाथा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येतेय. या अभियानाअंतर्गत ‘नमो सेवा – अनसुनी कहानियाँ’ या पथनाट्य उपक्रमाचा महाराष्ट्रातील शुभारंभ मुंबईतील केसी महाविद्यालय येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पथनाट्य सादर करणाऱ्या कलाकारांचा आणि संयोजकांचा सत्कार करण्यात आला. या शुभारंभ आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष आ. राहुल नार्वेकर, अमित साटम, महापौर रितू तावडे, निरंजन डावखरे,अमित गोरखे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित व्हिडीओ