Jalgaon | बोरनारच्या प्रेम धनगर हत्या प्रकरणात नातेवाईक आक्रमक; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव तालुक्यातील बोरनार येथे लग्नसमारंभात 21 वर्षीय प्रेम गोपाल धनगर याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याच्या घटनेनंतर नातेवाईक आक्रमक झाले आहेत. सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने आज जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रेम धनगर हा काही महिन्यांपासून कामानिमित्त अमळनेर येथे राहत होता. दोन दिवसांपूर्वीच तो बोरनार येथे गावी आला होता. बुधवारी गावातील लग्नसमारंभासाठी गेला असताना तेथे त्याचा काही तरुणांसोबत वाद झाला. यानंतर 15 ते 20 जणांच्या टोळक्याने त्याला मारहाण केली. त्यातील एकाने धारदार शस्त्राने वार केल्याने प्रेम गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, लग्नसमारंभात प्रेमचा दुसऱ्या एका तरुणासोबत वाद सुरू होता. मात्र, मारेकऱ्यांनी प्रेम आपल्यालाच शिवीगाळ करत असल्याचा गैरसमज करून घेत त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा खून केला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करत त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला

संबंधित व्हिडीओ