हिरवा शालू या सिनेमा साठी कास्टिंग काउच चा प्रकार घडल्याचा आरोप हा झालेला होता. कास्टिंग काउच प्रकाराची चौकशी सुपेकर यांच्याकडे होती आणि सुपेकर चौकशीला कधीही बोलवायचे असा आरोप करण्यात आलेला आहे. अपरात्री चौकशीला बोलावल्यामुळे लोक भयभीत झालेले होते आणि या प्रकरणाला वासना कांड असं नाव सुद्धा देण्यात आलेलं होतं अशी चर्चा त्यावेळी साताऱ्यामध्ये घडलेली होती.