जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू काश्मीरमध्ये तयार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील सर्वात उंच चिनाब पूलाचं आज उद्घाटन केलं. हा रेल्वे पूल तयार झाल्यानं भारताच्या विकासातील एक हा महत्त्वाचा क्षण मानला जातो. हा चिनाब पूल पॅरिसमधील, आयफेल टॉवर पेक्षा सुद्धा उंच आहे.