लांजा तालुक्यात काल सायंकाळी जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली.. आरगाव - कोंडगे भागात वादळी वाऱ्यासहीत जोरदार पाऊस पडला. अचानक पडलेल्या या अवकाळी पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला. मात्र या अवकाळी पावसामुळे आंबा बागातदारांची धाकधुकी वाढली.. आंबा पिकाची फळधारणा होत असतानाच पाऊस पडल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.