Navi Mumbai विमानतळावर नवं तंत्रज्ञान, 'फेस-टू-फ्लाय'मुळे बोर्डिंग प्रक्रिया जलद होणार | NDTV

नवी मुंबई नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या देशव्यापी डिजीयात्रा उपक्रमात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने डिजिटल पद्धतीने अधिकृत सहभाग नोंदवला आहे.अत्याधुनिक,तंत्रज्ञानाधारित प्रवास प्रक्रियेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. देशातील आणखी पाच विमानतळांवर हा उपक्रम एकाच वेळी सुरू करण्यात आला. या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. विमानतळाच्या टर्मिनलमध्ये मोठ्या स्क्रीनवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी प्रतीकात्मक स्वरूपात तीन प्रवाशांनी डिजीयात्रा गेटचा वापर करत बायोमेट्रिक प्रवेशद्वाराचे रिबन कापले. उपस्थित प्रवाशांनीही या नव्या सुविधेबाबत उत्सुकता व्यक्त केली. नव्या प्रणालीमध्ये चेहऱ्यावरील ओळख तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षा तपासणी सुलभ डिजीयात्रा प्रणालीमध्ये चेहऱ्यावरील ओळख तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. या प्रणालीमुळे विमानतळ प्रवेश, सुरक्षा तपासणी आणि बोर्डिंग प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ होते.संपूर्ण प्रक्रिया कॉन्टॅक्टलेस व पेपरलेस असल्याने प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी होणार आहे.

संबंधित व्हिडीओ