Narhari Zirwal यांचा PA रामदास गाडे नॉट रिचेबल, लाचखोरीप्रकरणी गाडेविरोधात तक्रार | NDTV मराठी

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात लाच प्रकरणी एसीबीचा तपास अजूनही कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याच्या अवतीभोवती फिरत आहे.   अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा पीए रामदास गाडे सध्या नॉट रिचेबल झालाय. लाचखोरी प्रकरणात झिरवाळ यांनी त्याची हकालपट्टी केली होती. मात्र एसीबीने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. एसीबीचा तपास सध्या राजेंद्र ढेरेंगेंभोवतीच फिरतोय. त्यामुळे लाच प्रकरणाच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ असूनही गाडेविरोधात कारवाई कधी असा सवाल उपस्थित झालाय.. तक्रारदाराने मंत्री झिरवाळ यांचा पीए रामदास गाडे याच्या विरोधातही तक्रार केली आहे. मात्र, रामदास गाडे याला अद्याप आरोपीच्या कक्षेत ग्राह्य धरण्यात आलेलं नाही.

संबंधित व्हिडीओ