Shaktipeeth Expressway | शक्तिपीठ महामार्गाविरोधात सोमवारी राज्यव्यापी आंदोलन | Protest News

कोल्हापूर शक्तिपीठ महामागाविरोधातील आंदोलनाची धार आणखी वाढवण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हयात सोमवारी आंदोलन करण्यात येणार असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये गोलमेज परिषद घेण्यात येणार असल्याची घोषणा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघटनेच्या बैठकीत शनिवारी करण्यात आली. राज्यातील शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघटनेच्या विविध जिल्ल्यांतील रस्त्यांची बैठक दूरचित्रसंवादाद्वारे काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर राज्य सरकार शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प पुढे रेटण्यासाठी कृतिशील असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सतेज पाटील यांनी लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प राबवणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही भूमिका बदलल्याचा आरोप केला. महामार्गासाठीचा निधी सध्याच्या खड्डेमय रस्त्यांवर खर्च करावा, विधिमंडळात ठाम भूमिका मांडू, असा इशारा दिला.

संबंधित व्हिडीओ