बीडमधील मृत व्यापारी महादेव मुंडे यांचा मुलगा प्रणव मुंडे याला परळीत मारहाण झालीय.बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची दोन वर्षांपूर्वी हत्या झाली होती. त्याचा एसआयटी कडून तपास केला जातोय.. नुकतीच काही आरोपींची नार्कोटेस्ट देखील करण्यात आलीय.. दरम्यान 19 फेब्रुवारी रोजी सोमेश्वर नगर परिसरात अभ्यासिकेला जात असताना प्रणव मुंडे याला एका व्यक्तीने मारहाण केले आहे. याप्रकरणी परळी पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.