मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष आता अधिक तीव्र झालाय. या संघर्षात आधी जरांगे विरुद्ध भुजबळ असा सामना पाहायला मिळत होता. मात्र आता काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनीही जरांगेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. राजकीय पटलावर विरोधात असणारे नेते जरांगेंविरोधात एकत्र आलेत. आणि या दोन्ही नेत्यांच्या गुप्त बैठका होत असल्याचा दावा जरांगेंनी केलाय. राजकारणाच्या पडद्याआड नेमकं काय काय घडतंय ? पाहुयात या रिपोर्टमधून