ज्येष्ठ गीतकार, लेखक आणि पटकथाकार जावेद अख्तर यांच्या एका वक्तव्याने देशभरात नवी चर्चा सुरू झाली आहे. राम हे कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित नाहीत, प्रत्येक भारतीयाच्या रक्तात राम आहेत,असं जावेद अख्तर यांनी म्हणताच त्यावर राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. एका बाजूला अनेक संत-महंतांनी या विधानाचं स्वागत केलं आहे, तर दुसऱ्या बाजूला काही मुस्लिम धर्मगुरूंनी त्यावर आक्षेप घेतलाय. पण या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे, राम हे नेमके कोणाचे? धर्माचे, राजकारणाचे की भारतीय संस्कृतीचे?